Ad will apear here
Next
विरारमंध्ये रंगणार एकता सांस्कृतिक महोत्सव
विरार : महाराष्ट्रभर विविध सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून विचारमंच उपलब्ध करून देणाऱ्या एकता कल्चरल अकादमीतर्फे २१ व २२ डिसेंबर २०१८ या कालावधीत पालघर जिल्ह्यात एकता सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव विरार शहरातील भाऊसाहेब वर्तक हॉल येथे होणार असून, हे या महोत्सवाचे ३० वे वर्ष आहे.

महोत्सवात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, यातील विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. समूह नृत्य स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार आणि पाच हजार, रोख रुपये, तसेच पारंपारिक नृत्य, उत्तेजनार्थ, उत्कृष्ट दिग्ददर्शन, अभिनय, गायन, काव्यवाचन, एकेरी नृत्य या स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिके, एकता सुवर्णपदक, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे; तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
 
मुंबई आणि महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील, तसेच महाविद्यालयीन कलावंतांना या एकता सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन एकता कल्चरल एकदमीचे अध्यक्ष कवी प्रकाश जाधव यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी पत्ता : ए/२०४, विशाल हेवन हाउसिंग सोसायटी, मनवेलपाडा रोड, विरार (पूर्व).
संपर्क : ८३६९१ ५३४८३, ९८६०२ ६९६७५, ९८९०५ ६०९९९
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZOHBV
Similar Posts
मासवण आश्रमशाळेत रंगला ‘संवाद शब्दांचा शब्दांशी’ पालघर : साहित्यविषयक रुची व ज्ञान वाढीस लागावे आणि आपली बोली भाषा जतन व्हावी म्हणून वसई येथील शब्दांगण प्रस्तुत ‘संवाद शब्दांचा शब्दांशी’ या उपक्रमाचा २४वा प्रयोग पालघर येथील मासवण आश्रमशाळेत झाला.
सुधीर दळवी यांना यंदाचा ‘एकता कला गौरव’ ठाणे : एकता कल्चरल अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा अकादमीचे अध्यक्ष कवी प्रकाश जाधव यांनी केली असून, यंदाचा एकता कला गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते सुधीर दळवी यांना जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे डॉ. गणेश चंदनशिवे, सुहास बिरहाडे, विशाल पाटील, डॉ. कनक नागले, प्रभाकर मोसमकर यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन पालघर : साखरी मोखाडा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन २८ फेब्रुवारी २०१९ रोजी साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींना शाळेतील विज्ञान शिक्षक दिनेश घनघाव यांनी जादूटोणा कसा केला जातो यावर प्रात्यक्षिके दाखविली.
आशा जाधव शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित वसई : तालुक्यातील कामण केंद्रातील खिंडीपाडा जिल्हा परिषद शाळेच्या सहशिक्षिका आशा चिंतामण जाधव यांना सन २०१८-१०१९ वसई तालुकास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language